तळेगांव दाभाडे उपासना केंद्राविषयी

|| हरी ॐ||

दिनांक ४ डिसेंबर २००१ तळेगाव उपासना केंद्राचा सुवर्ण दिवस या दिवशी म्हणजेच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सद्गुरुश्री अनिरुद्ध बापूंच्या चिन्मय पादुका बापूंच्या सानिध्यात जुईनगर येथे केंद्रास बहाल करण्यात आल्या एकून १०० श्रद्धावान या सोहळ्यास उपस्थित होते।। 

तळेगाव विषयीची माहिती बापूंच्या शब्दात

" तळेगाव म्हणजे काय//.../तळ ठोकणे म्हणजे मुक्काम करणे …  साक्षात परमेश्वराचा मुक्काम तळ असलेले गाव म्हणजे तळेगाव...  तुम्ही या पादुका तळेगावला घेऊन जात आहात म्हणजेच तुम्हाच्या परमेश्वराला या गावात तळ ठोकण्यासाठी घेऊन जात आहात, मात्र केवळ यावरच समाधान न मानता हा परमेश्वर सदैव माझ्या हृदयातच कसा राहील माझ्यादेहाचंच मी तळेगाव करील आस प्रयत्न जात तुम्ही केलात तर ते मला जास्त आवडेल.. आज तुम्ही येथून या पादुका घेऊन जाणार त्या कोणाच्या आहेत तुम्ही जर म्हणालात बापू या आमच्या पादुका आहेत,, माझ्या पादुका आहेत तर तुम्ही फक्त पादुकाच घेऊन जाल आणि जर तुम्ही म्हणालात कि या पादुका माझ्या सदगुरुंच्या आहेत तर तुम्हाला 
॥  पादुका म्हणुया कैश्या दिसती चक्रपाणी उभे ॥ 
या आद्यपिपांच्या म्हणण्याचा अर्थ लक्ष्यात येईल तुम्ही\ फक्त पादुका नाही तर तुमच्या बापूला घेऊन जात आहात.








No comments:

Post a Comment