केंद्रातील १३ कलमी कार्यक्रमाविषयी

हरी ओम 

भक्ती सेवेच्या उपक्रम मध्ये भक्तिप्रधान सेवांविषयी सद्गुरुंनी ३ ओक्टोबर २००२ रोजी १३ कलमी कार्यक्रमाची घोषणा केली हा कार्यक्रम सांगताना बापू म्हणाले

" मी आज इथे उभा आहे तो एका धर्माक्षेत्रावर उभा आहे. धर्माक्षेत्राचे कुरुक्षेत्र होऊ नये म्हणून  उभा आहे हेलक्षात ठेवा. कुरुक्षेत्र टाळण्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करीन..... हे धर्मक्षेत्र म्हणजे कुठल्याही विशिष्ट धर्माचे क्षेत्र मला अभिप्रेत नाही हे लक्षात ठेवा कारण मला जो अभिप्रेत आहे तो मानव धर्म.. सत्य प्रेम आनंत हाच तो धर्म.. आणि याच सत्य प्रेम व आनंदाच्या शत्रूंची आपल्याला १०० टक्के लढायचं "

सन २००२ च्या या प्रवचनातील महत्वाचा मुद्दा सद्गुरूंच्याच शब्दात.....


या मानव धर्माला अनुसरून १३ कलमी योजनेतील काही कलम आपण तळेगाव उपासना केंद्रा अंतर्गत सन २००२ पासून राबवत आहोत.. त्याविषयीची माहिती आणि क्षणचित्रे.....

वर्ष २०१४ :-

मायेची ऊब (गोधडी) :-  

या योजने अंतर्गत केंद्रामध्ये शिबीर घेण्यात येते... त्याच प्रमाणे दर बुधवारी आणि शुक्रवारी गोधडी घालण्याची सेवा राबविली जाते ज्यामध्ये सरासरी १० भक्त कार्यकर्ते सहभागी होतात..

सन २०१४ मध्ये आत्तापर्यंत पर्यंत आपण ६२ गोधड्या पूर्ण केल्या ज्यातील ३७ गोधड्यांचे वाटप करण्यात आले

१६ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या गोधडी शिबिराची काही क्षणचित्रे




जुने ते सोने योजना :-

या योजने अंतर्गत आपण ११ मे २०१४ रोजी पुणे जिल्यातील पवन मावळ भागातील कोटमवाडी , चाफेसार कोळे , मोरवे या खेड्यांमध्ये कपडे, भांडी , खेळणी आणि बांगड्यांचे वाटप केले. त्याची काही क्षणचित्रे आणि
अहवाल

सर्व्हे :- 





कपड्यांची वर्गवारी :-




कपडे वाटप :-








स्वच्छता :- 

या योजने अंतर्गत आपण आपल्या उपासना केंद्राची अनेकदा स्वच्छता तसेच लावालावी करीत असतो. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे











No comments:

Post a Comment