केंद्रातील भक्तीप्रधान कार्यक्रमांविषयी

|| हरी ओम ||

अध्यात्म हाच आपल्या संस्थेचा पाया आहे आणि हीच गोष्ट आपल्या प्रवचनातून सांगताना सद्गुरू अनेकदा आपल्याला अनेकविध भक्ती उपक्रमांबद्दल सांगत असतात व असे अनेकविध भक्ती उपक्रम तळेगाव उपसानाकेंद्रा मार्फत आपण राबवत असतो. त्या कार्यक्रमांविषयी काही...

सन २०१४

१०८ वेळा अनिरुद्ध चालिसेचे पठाण :- गुरुचरण मास म्हणजेच वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा या कालावधीचे अवचीत्य साधुन तळेगाव उपसानाकेंद्रामध्ये १०८ वेळा अनिरुद्ध चालिसेचे पठण घेण्यात आले.

१०८ वेळा हनुमान चालिसेचे पठण :-   या गुरुचरण मासामध्ये तळेगाव उपसानाकेंद्रामार्फत प्रत्येक श्रद्धावान भक्तांच्या घरी पादुका पूजन व १०८ वेळा हनुमान चालिसा पठण घेण्यात आले.

सांघिक पठण :- दर महिन्यातील एका रविवारी संपूर्ण केंद्राचे असे १ तास एकत्रीत पठण केले जाते. या मध्ये राम्रासायान , मातृवात्सल्यविन्दानमचे काही अध्याय , मुलार्क गणपती जप अशी वेगवेगळी पठण केली जातात

यामध्ये

जून २०१४              : - १०८ वेळा अनिरुद्धचालिसापठण

मे २०१४                :- १ तास आदिमातास्तवन
 

विभागीय पठण : - तळेगावचा भौगोलिक विचार करता आपण एकून २ विभाग केले आहेत ज्यामध्ये गाव विभाग व कॉलनी विभागाचा समावेश होतो. दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी ये दोन्हीही विभागात श्रद्धावान कोणत्याही श्रद्धावान भक्ताच्या सोयीनुसारएकत्र जमून केंद्राने ठरविलेले विशिष्ट पठण करतात. यासाठीची नोंदणी श्रद्धावान भक्त केंद्रामध्ये करू शकतात..



No comments:

Post a Comment