उपासना केंद्र आणि केंद्र अंतर्गत झालेले अनुभवसंकीर्तनाचे कार्यक्रम

।। हरि ॐ।।


 मग जो गाई वाडेकोडे | माझे चरित्र माझे पोवाडे ||
तयाचिया मी मागेपुढे |  चोहीकडे उभाची ||

प.पू.समीरदादांनी सन २०१२ च्या अधिवेशाना मध्ये गुणसंकीर्तनाचे महत्व सांगताना दादा म्हणाले सद्गुरू गुणसंकीर्तन केल्याने आणि ऐकल्याने माझी भक्ती अधिकाधिक दृढ होते सदगुरु वरचा विश्वास पक्का होतो. 
आणि म्हणूनच आपण २०१४ च्या आधिवेशाना पर्यंत कोणतीही नवीन सेवा न घेता फक्त गुनासंकीर्तांचेच कार्यक्रम करणार आहोत.

प.पू.समीरदादांनी सांगितल्यानुसार तळेगाव केंद्रातून गुणसंकीर्तनाचे कार्यक्रम सुरु करण्यात आले. त्या प्रमाणे केंद्राने गुणसंकीर्तन समिती तयार केली. या मध्ये गुणसंकीर्तन करणारे कार्यकर्ते आणि गुणसंकीर्तनाचे नियोजन करणारे कार्यकर्ते या प्रमाणे नियोजन करण्यात आले. 
सर्व प्रथम गुणसंकीर्तन व त्याच्या मार्गदर्शनासाठी शिबिराचे नियोजन तळेगाव दाभाडे येथे करण्यात आले. यामध्ये तळेगाव दाभाडे, देहूरोड, लोणावळा, वडगाव मावळ, आणि खोपोली उपासना केंद्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरामध्ये सादानंदसिंह वर्तक यांनी मार्गदर्शन केले. तसेच प.पू. समीरदादांची VCD दाखवण्यात आली. 
या शिबिराची काही क्षणचित्रे. :-   







सदानंदसिंह वर्तक गुणसंकीर्तन करताना


प.पू.सामिरदादांची मार्गदर्शनाची DVD


प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नांची उत्तरे देताना

श्रद्धावान प्रश्न विचारताना



 दिनांक २३ एप्रिल २०१४ रोजी म्हाडा कॉलनी माळवाडी, तळेगाव दाभाडे येथे गुणसंकीर्तन आयोजित करण्यात आले होते. सदरचे गुणसंकीर्तन हे मयुरसिंह पाटणकर यांनी केले. एकुण ३५ नवीन श्रद्धावान या गुणसंकीर्तानास उपस्थित होते.

दिनांक १६ डिसेंबर २०१३ रोजी श्री दत्ता मंदिर बाजारपेठ तळेगाव दाभाडे येथे गुणसंकीर्तानाचे आयोजन करण्यात आले होते. हे गुणसंकीर्तन मयुरसिंह पाटणकर यांनी केले. या कार्यक्रमास एकुण २० नवीन श्रद्धावान उपस्थित होते.

दिनांक २७ ऑक्टोबर २०१३ रोजी म्हाडा कॉलनी, तळेगाव चाकण रोड, येथे गुणसंकीर्तानाचा कार्यक्रम झाला. मयुरसिंह पाटणकर यांनी गुणसंकीर्तन केले. एकुण ३५ नवीन श्रद्धावान उपस्थित होते.

दिनांक ३ मार्च २०१४ रोजी देहूरोड येथे गुणसंकीर्तानाचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे गुणसंकीर्तन मायुरसिंह पाटणकर यांनी केले. एकुण २० नवीन श्रद्धावान भक्त उपस्थित होते.

दिनांक १६ फेब्रुवारी २०१२ रोजी खंडोबा मंदिर, तळेगाव दाभाडे येथे गुणसंकीर्तन आयोजित करण्यात आले होते. एकुण २४ नवीन श्रद्धावान गुणसंकीर्तानास उपस्थित होते. गुणसंकीर्तानाची काही क्षणचित्रे.

कार्यकर्ता गुणसंकीर्तन करताना



गुणसंकीर्तानास उपस्थित नवीन श्रद्धावान

दिनांक २३ फेब्रुवारी २०१२ रोजी मारुती मंदिर, गणपती चौक, तळेगाव दाभाडे येथे गुणसंकीर्तन झाले.
माधुरावीरा प्रधान यांनी हे गुणसंकीर्तन केले. एकुन २० नवीन श्रद्धावान गुणसंकीर्तानास उपस्थित होते. गुणसंकीर्तनाची काही क्षणचित्रे.







 पुणे केंद्राअंतर्गत आयोजित केलेल्या गुणसंकीर्तन सप्ताहात तळेगावातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच या कार्यकर्त्यांनी मुंबई, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा तसेच राजगुरुनगर येथे गुणसंकीर्तन केले.

आम्ही अम्बज्ञ आहोत.

|| हरी ॐ ||

प. पु. समीरदादांनी सांगितल्या प्रमाणे तळेगाव उपसानाकेंद्रामध्ये अनुभवसंकीर्तानाचे कार्यक्रम सुरु करण्यात आले. तळेगाव मध्ये प्रत्येक महिन्यास विभागानुसार अनुभवसंकीर्तन सुरु झाले. त्याची काही क्षणचित्रे.
हास्य योग क्लास, पंचवटी कॉलनी 
नालबंद गल्ली
नालबंद गल्ली
नालबंद गल्ली
मनोहर नगर 
मनोहर नगर 
सोमाटणे फाटा
सोमाटणे फाटा
सोमाटणे फाटा
म्हसकरनेस कॉलनी
म्हसकरनेस कॉलनी

हास्य योग क्लास, पंचवटी कॉलनी




|| हरि ॐ||
आम्ही अंबज्ञ आहोत.


No comments:

Post a Comment