Wednesday 20 August 2014

रक्तदान शिबीर व घोरकष्टोध्दरण स्तोत्रपठण- १५ ऑगस्ट २०१४

|| हरि ॐ ||

शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०१४ रोजी "स्वातंत्र्यदिनाचे" औचित्य साधून "पुरुषार्थ मंडलम कलश-०२-MH१२-०२०" अर्थात "लोणावळा", "वडगांव मावळ", "तळेगांव दाभाडे" व "देहूरोड" या केंद्रांतर्फे "रक्तदान शिबीर व घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठण" आयोजित करण्यात आले होते. "तळेगांव दाभाडे" येथील "कै. नथूभाऊ भेगडे प्रशाला क्र ०१" येथे आयोजित करण्यात आलेल्या ह्या उपक्रमात चारही केंद्रातील श्रद्धावान कार्यकर्ते, भक्त तसेच अनेक नवीन लोकांनीसुद्धा सहभाग घेतला. तळेगावातील "गरवारे रक्तपेढी" च्या सहाय्याने झालेल्या ह्या रक्तदान शिबिरात एकूण "४१" पिशव्या रक्त जमा झाले. यासोबतच चालू असलेल्या घोरकष्टोध्दरण स्तोत्र पठणामध्ये दत्तगुरूंच्या मूर्तीवर अखंड तुळशीपत्रांचा अभिषेक सुरु होता. बापूंच्या आशीर्वादाने अत्यंत सुंदर व भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या ह्या उपक्रमाची काही क्षणचित्रे:









नावनोंदणी
रक्तदानाची प्राथमिक नावनोंदणी करताना

हिमोग्लोबिन व इतर गोष्टींसाठी रक्ततपासणी करताना



कार्यकर्ते रक्तदान करताना

कार्यकर्ते रक्तदान करताना

रक्तदान झाल्यावर भक्तांना AADM व रक्तपेढीतर्फे प्रशस्तीपत्रके दिली गेली


मांडणी


मांडणी

पठणाच्या कक्षात दत्तगुरूंची मूर्ती

पठणाच्या वेळी दत्तगुरूंच्या मूर्तीवर तुळशीपत्रांचा अखंड अभिषेक



आरती    



 || आम्ही अम्बज्ञ आहोत ||















Thursday 24 July 2014

|| हरि ॐ ||

दिनांक २८ जुलै २०१४ रोजी पुरुषार्थ मंडलम कलश अंतर्गत तुंगार्ली, लोणावळा येथे वृक्षारोपण सेवा आयोजित करण्यात आली होती. या सेवे अंतर्गत एकूण ५०० रोपे लावण्यात आली. या सेवेमध्ये तळेगाव दाभाडे उपासना केंद्रातून एकूण १२ श्रद्धावानांनी सहभाग घेतला होता.
आम्ही अम्बज्ञ आहोत.



पुरुषार्थ मंडलम कलश ग्रुप


कार्यकर्ते रोपे लावताना














|| हरि ॐ ||

दिनांक २७ जुलै २०१४ रोजी पुरुषार्थ मंडलम कलश २-MH-१२-०२०.( तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, लोणावळा आणि देहूरोड ) ची पहिली वार्षिक मिटिंग संपन्न झाली. गौरांगसिंह वागळे यांनी हि मिटिंग घेतली. गौरांगसिंहनी घेतलेली ही मिटिंग दै.प्रत्यक्ष, कृपासिंधु आणि गुणसंकीर्तन या विषयांवर आधारित होती. या मिटिंगची काही क्षणचित्रे.






मीटिंगमध्ये मुद्दे मांडताना गौरांगसिंह वागळे










|| हरि ॐ ||

दिनांक २६ जुलै २०१४ रोजी प.पू.नंदाई च्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ तळेगाव उपसानाकेंद्राच्या ब्लॉग चे उद्घाटन झाले. ब्लॉग ची काही क्षणचित्रे.









||हरी ॐ ||

रविवार दि. २२ जून २०१४ रोजी सद्गुरु श्री अनिरुध्द उपासना केन्द्र- तळेगांव दाभाडे च्या अंतर्गत अनिरुध्द चालीसेचे १०८ वेळा सामुहिक पठण संपन्न झाले. या पठणसेवेत ५६ श्रध्दावानांनी सहभाग घेतला. सदर उपक्रमाची काही क्षणचित्रे:

स्वागत रांगोळी

बापूंच्या चिन्मय मूर्ती व पादुकांचे आगमन

पठण

सहभागी श्रद्धावान




सद्गुरूंची विलोभनीय मूर्ती




सद्गुरूंच्या मूर्तीवर तुळशीपत्रांचा अभिषेक



सद्गुरूंच्या पादुका

आम्ही अम्बज्ञ आहोत

||हरी ॐ||